चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली या संघाने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. आता आयपीएल 2025 च्या आधी, चेन्नई संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि श्रीधरन श्रीराम यांची सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीरामकडे प्रचंड अनुभव आहे, जो सीएसके संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. यापूर्वी ड्वेन ब्राव्हो सीएसकेमध्ये सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत होते. पण आता ते कोलकाता नाईट रायटर्सचा मार्गदर्शक बनले आहे.
श्रीधरन श्रीराम हे 2016 ते 2022 पर्यंत ऑस्ट्रेलियन संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. त्याने आरसीबी संघासोबत फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये आशिया कप आणि टी२० विश्वचषकापूर्वी बांगलादेशचा टी20 सल्लागार म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी बांगलादेश संघासाठी तांत्रिक सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
श्रीधरन श्रीराम हे आयपीएल 2024 साठी लखनौ सुपर जायंट्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. ते दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षकही राहिले आहे. आता चेन्नई सुपर किंग्ज संघात, ते मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असेल.
आयपीएल 2025साठी सीएसके संघ:
ऋतुराज गायकवाड, मथिशा पाथिराणा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, आर. अश्विन, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुर्जपनीत सिंग, नाथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.