आशिया चषकापूर्वी कर्णधार रोहित शर्मा तिरुपती मंदिरात
सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (23:01 IST)
आशिया चषक 2023 साठी उलटी गिनती सुरू झाली आहे. ही स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ 2 सप्टेंबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कुटुंबासह तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचला. चाहत्यांनीही त्याचे जोरदार स्वागत केले. कॅप्टन रोहितची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर दिसत होते.
व्हायरल व्हिडिओमध्ये कॅप्टन रोहित शर्मा पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी आला होता . आशिया चषकापूर्वी रोहितचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे.
आशिया चषकापूर्वी रोहित देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आला असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत तो आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार खेळी करताना दिसणार आहे.