IND vs WI Playing 11 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T20I मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर खेळवला जाईल. सध्या मालिका २-२ अशी बरोबरीत आहे. पहिले दोन सामने विंडीजने जिंकले होते. त्याचवेळी भारताने पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सामना जिंकला. आता शेवटचा सामना निर्णायक असेल. सलग दोन विजयानंतर टीम इंडियामध्ये बदल होण्याची शक्यता कमी असली तरी वेस्ट इंडिजच्या संघात अनेक बदल होऊ शकतात.
शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता, पण चौथ्या टी-२०मध्ये तिलक वर्माला ऑर्डर खाली पाठवण्यात आली. आता पुन्हा एकदा पाचव्या सामन्यात सूर्या या ठिकाणी फलंदाजीसाठी येऊ शकतो. याशिवाय भारतीय संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. हा मालिकेतील निर्णायक सामना आहे आणि या विजयासह हार्दिकला त्याच्या नेतृत्वाखाली एकही T20 मालिका न गमावण्याचा विक्रम कायम ठेवायचा आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
वेस्ट इंडिज : ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, अकिल होसेन, ओबेद मॅककॉय.
भारत:यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (क), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.