रोहित शर्मा बाबा झाले, सिडनी कसोटीत खेळणार नाही

मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा बाबा झाले आहेत आणि आता ते ऑस्ट्रेलियाचा विरुद्ध 3 जानेवारी पासून सिडनीत होणाऱ्या अंतिम कसोटीत नाही खेळणार.
 
रोहितच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि रोहितने जीवनातला हा आनंद साजरा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाहून मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने रोहितला जीवनातील या नवीन पाडावासाठी शुभेच्छा दिल्या.
 
बीसीसीआयने सांगितले की रोहित आता चौथ्या कसोटीत खेळणार नाही आणि 8 जानेवारीला एकदिवसीय क्रिकेट संघात सामील होईल.
 
रोहित 8 जानेवारीला संघासोबत जुळतील. संघ 12 जानेवारीपासून सुरू होणार्‍या एक दिवसीय मालिकेची तयारी करेल. बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर काही क्षणातच रोहितला, आपण बाबा झालोय याची बातमी कळली. ही लहानशी परी रोहित शर्मा आणि रितिका यांचे पहिले मुलं आहे.
 
3 जानेवारी पासून सिडनीत चालू होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटीत रोहितच्या जागी ऑलराउंडर हार्दिक पांड्याला सामील केलं जाऊ शकतं. तिसर्‍या कसोटीत रोहितने भारताच्या पहिल्या डावात नाबाद अर्धशतक ठोकले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती