विराट अनुष्काला लाडाने काय म्हणतो…?

शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (09:12 IST)
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपल नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहते. त्यातच नुकतीच अनुष्का विराटला भेटायला श्रीलंकेला गेली होती. त्यावेळचे फोटोदेखील समोर आले होते.
 
दरम्यान, आता या दोघांच्या बाबतीत आणखी एका खास गोष्टीचा खुलासा झाला आहे.  १५ ऑगस्टला अनुष्का विराटला भेटण्यासाठी श्रीलंकेला गेली होती. इथे दोघांनी सोबत काही वेळ घालवला. इथे असताना दोघांनी काही फॅन्ससोबत फोटोही काढलेत. यादरम्यान एका फॅनला विराटची एक गोष्ट माहिती पडली. विराट अनुष्काला लाडाने काय हाक मारतो, हे या फॅनला कळाले.  मग काय या फॅनने याचा खुलासा केला नसता तर नवल. विराट कोहली अनुष्काला लाडाने Nushkie (नुष्की) अशी हाक मारतो. मस्तय ना? फॅन या दोघांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत हा खुलासा केला आहे. त्यानंतर काही मिनिटातच हे नाव सोशल मीडियात व्हायरल झाले. तसे या विराट आणि अनुष्काच्या जोडीला Virushka (विरुष्का) असे म्हटले जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती