इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

शनिवार, 20 मार्च 2021 (14:24 IST)
भारत व इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीकडे संघाचे कर्णधारपद असून मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादव व शुभमन गिल यांना एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे. भारत व इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तीन सामने दि. 23, 26 व 28 मार्च या दिवशी पुण्यात खेळवण्यात येणार आहेत.
 
इंग्लंडविरोधातील चौथ्या टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमारने अर्धशतक साजरे करत सर्वांना आपली नोंद घेण्यास भाग पाडले. विजय हजारे स्पर्धेत धावांची बरसात करणार्‍या पृथ्वी शॉला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेला गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
 
भारतीय संघ :  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, कुणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा व शार्दुल ठाकूर.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती