साक्षी देते धोनीस फ्लाइंग किस

शुक्रवार, 12 एप्रिल 2013 (16:45 IST)
FILE
आयपीएलमध्ये कुणाच्या स्टाइल स्टेटमेंटने आतापर्यंत सर्वाधिक लक्ष खेचले आहे. प्रीती झिंटाचे आपल्या संघासाठी झेंडा लहरवणे व सामन्यानंतर प्रेक्षकांना संघाच्या जर्सी वाटणे, सानिया मिर्झाचे मोकळ्या केसातून हात फिरवणे की शिल्पा शेट्टीची खेळाडूंना चिअर करण्याची वेगळी अदा?

क्रिकेटचे चाहते आयपीएल दरम्यान या सगळ्यांचा मनापासून आनंद घेते. मुंबई इंडियन्सची मालकीन नीता अंबानी सुद्धा सितार्‍यांच्या मांदियाळीत आपल्या स्थूल मुलासोबत लक्ष वेधून घेते. क्रिकेटपटूंच्या पत्नींना सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतेय.

मैदानावर सौंदर्य बिखरण्याचे प्रयत्न भरपूर होते, मात्र सर्वांमध्ये उत्तम स्टाइल स्टेटमेंट राहिले आहे मिसेस धोनीचे. धोनीच्या शॉटवर फ्लाइंग किस देण्याची साक्षीची अदा अधिक भाव खाऊन गेली आहे. चेन्नई सुपरकिंग्सला तिच्यापेक्षा उत्तम चिअरलीडर खरेच मिळेल काय?

वेबदुनिया वर वाचा