मांजरेकरच्या ड्रीम संघात गांगुली नाही

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या ५00 व्या कसोटीचा उत्सव साजरा करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना भारताचा ड्रीम संघ निवडण्याची संधी दिली. त्यानंतर भारताचा माजी कसोटीपटू आणि आता समालोचक संजय मांजरेकर यानेदेखील आपल्या ड्रीम संघाची घोषणा केली आहे.

मांजरेकरने त्याच्या ड्रीम संघात सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, गुंडप्पा विश्वनाथ, महेंद्रसिंह धोनीला संघात स्थान देण्यात आले आहे. मांजरेकरने त्याच्या ड्रीम संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीदेखील धोनीवर सोपवली आहे.

कपिलदेव, जहीर खान, बिशनसिंह बेदी आणि इरापल्ली प्रसन्ना यांना स्थान दिले आहे. 11 वा खेळाडू म्हणून भागवत चंद्रशेखर यांनी संघात स्थान दिले आहे. मांजरेकरने गांगुलीशिवाय टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळेंनादेखील स्थान दिलेले नाही.

वेबदुनिया वर वाचा