पाक नवीन खेळाडूंना संधी देणार

भाषा

मंगळवार, 28 जुलै 2009 (17:45 IST)
श्रीलंकेकडून कसोटी मालिकेत पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तान एकदिवसीय मालिकेसाठी नवीन खेळाडूंना संधी देणार आहे. येत्या गुरुवारपासून ही एकदिवसीय मालिका सुरु होत आहे.

पाकिस्तानला कसोटी मालिकेत श्रीलंकेकडून 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. मालिकेतील पहिले दोन सामने श्रीलंकेने जिंकले होते तर तिसरा सामना ‍अनिर्णित राहिला होता. आता एकदिवसीय मालिकेत कर्णधार युनूस खान नवीन खेळाडूंना संधी देणार आहे. त्यात 19 वर्षीय फलंदाज उमर अकमल याचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी, वेगवान गोलंदाज इम्रान नझीर यांचीही निवड एकदिवसीय संघात होवू शकते.

वेबदुनिया वर वाचा