अलबत्या गलबत्याया प्रसिध्द बालनाट्यातून चिंचि चेटकिणीची भूमिका साकारणारे अभिनेते वैभव मांगले यांनी या नाटकातून एक्झिट घेतली आहे. याबबात त्यांनी फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. मी चिंचि चेटकीणीचं काम सोडलं आहे. आताती मी नाहीच अशा आशयाची पोस्ट मांगले यांनी शेअर केली आहे. आता वैभव मांगले यांच्याऐवजी अभिनेता निलेश गोपनारायण चिंचि चेटकिणीची भूमिका साकारणार आहेत. वैभव मांगले यांनी या नाटकाचा निरोप घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, निर्माते राहुल भंडारे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.