हॅशटॅग 'बॅन लिपस्टिक'च्या रहस्याला पूर्णविराम देत संजय जाधव दिग्दर्शित 'अनुराधा' ही ७ भागांची वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी ओटीटी', अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
दिग्दर्शक संजय जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या एकत्र येण्याने जेव्हा एखादी कलाकृती घडते, तेव्हा ती नेहमीच उत्तम असते, यात काही शंका नाही. तसेच काहीसे 'अनुराधा' या वेबसिरीजच्या बाबतीत घडताना दिसून येते. संजय जाधव आणि तेजस्विनी पंडित या जोडीने एकत्र येत सादर केलेल्या कलाकृतीला 'ट्रिपल धमाका'च म्हणता येईल. कारण, टीझर पाहता लक्षात येते की 'अनुराधामध्ये' तेजस्विनी पंडितच्या एक नाही, दोन नाही तर तब्बल तीन व्यक्तिरेखा दिसून येत आहेत. यावरून या वेबसिरीजमध्ये तेजस्विनी पंडित आपल्याला तिहेरी भूमिकेत दिसणार आहे का ? हे तुम्हाला वेबसिरीज पाहिल्यावरच कळेल. संजय जाधव यांनी मात्र या वेबसिरीजसाठी तिहेरी भूमिका निभावली आहे. प्लॅनेट मराठी प्रस्तुत 'अनुराधा' या वेबसिरीजच्या माध्यमातून संजय जाधव तांत्रिकदृष्ट्या तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत. म्हणजेच दिग्दर्शनासोबतच त्यांनी सिनेमॅटोग्राफर व लेखनाची धुराही सांभाळली आहे.
'अनुराधा' बाबत दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, "आपला मराठी प्रेक्षकवर्ग हा थोडा भावनिक आहे, त्यामुळे त्यांना ही व्यक्तिरेखा आपलीशी वाटावी जवळची वाटावी हे माझ्यासाठी प्रत्येकवेळी महत्वाचे असते. 'अनुराधा' बघताना प्रत्येक भागामध्ये तुमची उत्कंठा वाढते. तुम्ही पुढचा भाग बघण्यास उत्सुक होता. शेवटी सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. त्यामुळे 'अनुराधा' हे एक सस्पेन्स आणि थ्रिरल पॅकेज आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल म्हणते, "या वेबसिरीजमध्ये अनेक गोष्टी मी केल्या आहेत ज्या याआधी मी कधीही केल्या नव्हत्या. खरंतर ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती. दरवेळी मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. मी अशी आशा करते की प्रेक्षकांना ही वेबसिरीज आणि माझी भूमिका नक्की आवडेल."
'अनुराधा' बाबत 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''तेजस्विनी पंडित आणि या वेबसिरीज मधील सर्वच कलाकार हे उत्कृष्ट आहेत. संजय जाधव यांनी दिग्दर्शनाची धुरा अतिशय उत्तम सांभाळली आहे. नुकतीच ही वेबसिरीज प्लॅनेट मराठीवर झळकली असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या वेबसीरिजचे वैशिष्टय म्हणजे तेजस्विनी आणि संजय जाधवची तिहेरी भूमिका. दोघांच्याही या भूमिकांचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे"
अनुराधामध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोबत सचित पाटील, सोनाली खरे, सुशांत शेलार, स्नेहलता वसईकर, सुकन्या कुलकर्णी मोने, चिन्मय शिंत्रे, विद्याधर जोशी, विजय आंदळकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, वृषाली चव्हाण हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'अनुराधा'च्या निमित्ताने संजय जाधव यांनी वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण केले आहे. हिरालाल दाफडा आणि आकाश दाफडा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या वेबसीरिजचे लेखन संजय जाधव, वैभव चिंचळकर यांचे असून पंकज पडघम यांनी संगीत दिले आहे. तर संकलनाचे काम अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी पाहिले असून कला दिग्दर्शक सतीश चिपकर आहेत.तेजस्विनी आणि संजय जाधव यांचा ट्रिपल धमाका
हॅशटॅग 'बॅन लिपस्टिक'च्या रहस्याला पूर्णविराम देत संजय जाधव दिग्दर्शित 'अनुराधा' ही ७ भागांची वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी ओटीटी', अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
दिग्दर्शक संजय जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या एकत्र येण्याने जेव्हा एखादी कलाकृती घडते, तेव्हा ती नेहमीच उत्तम असते, यात काही शंका नाही. तसेच काहीसे 'अनुराधा' या वेबसिरीजच्या बाबतीत घडताना दिसून येते. संजय जाधव आणि तेजस्विनी पंडित या जोडीने एकत्र येत सादर केलेल्या कलाकृतीला 'ट्रिपल धमाका'च म्हणता येईल. कारण, टीझर पाहता लक्षात येते की 'अनुराधामध्ये' तेजस्विनी पंडितच्या एक नाही, दोन नाही तर तब्बल तीन व्यक्तिरेखा दिसून येत आहेत. यावरून या वेबसिरीजमध्ये तेजस्विनी पंडित आपल्याला तिहेरी भूमिकेत दिसणार आहे का ? हे तुम्हाला वेबसिरीज पाहिल्यावरच कळेल. संजय जाधव यांनी मात्र या वेबसिरीजसाठी तिहेरी भूमिका निभावली आहे. प्लॅनेट मराठी प्रस्तुत 'अनुराधा' या वेबसिरीजच्या माध्यमातून संजय जाधव तांत्रिकदृष्ट्या तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत. म्हणजेच दिग्दर्शनासोबतच त्यांनी सिनेमॅटोग्राफर व लेखनाची धुराही सांभाळली आहे.
'अनुराधा' बाबत दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, "आपला मराठी प्रेक्षकवर्ग हा थोडा भावनिक आहे, त्यामुळे त्यांना ही व्यक्तिरेखा आपलीशी वाटावी जवळची वाटावी हे माझ्यासाठी प्रत्येकवेळी महत्वाचे असते. 'अनुराधा' बघताना प्रत्येक भागामध्ये तुमची उत्कंठा वाढते. तुम्ही पुढचा भाग बघण्यास उत्सुक होता. शेवटी सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. त्यामुळे 'अनुराधा' हे एक सस्पेन्स आणि थ्रिरल पॅकेज आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल म्हणते, "या वेबसिरीजमध्ये अनेक गोष्टी मी केल्या आहेत ज्या याआधी मी कधीही केल्या नव्हत्या. खरंतर ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती. दरवेळी मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. मी अशी आशा करते की प्रेक्षकांना ही वेबसिरीज आणि माझी भूमिका नक्की आवडेल."
'अनुराधा' बाबत 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''तेजस्विनी पंडित आणि या वेबसिरीज मधील सर्वच कलाकार हे उत्कृष्ट आहेत. संजय जाधव यांनी दिग्दर्शनाची धुरा अतिशय उत्तम सांभाळली आहे. नुकतीच ही वेबसिरीज प्लॅनेट मराठीवर झळकली असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या वेबसीरिजचे वैशिष्टय म्हणजे तेजस्विनी आणि संजय जाधवची तिहेरी भूमिका. दोघांच्याही या भूमिकांचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे"
अनुराधामध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोबत सचित पाटील, सोनाली खरे, सुशांत शेलार, स्नेहलता वसईकर, सुकन्या कुलकर्णी मोने, चिन्मय शिंत्रे, विद्याधर जोशी, विजय आंदळकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, वृषाली चव्हाण हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'अनुराधा'च्या निमित्ताने संजय जाधव यांनी वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण केले आहे. हिरालाल दाफडा आणि आकाश दाफडा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या वेबसीरिजचे लेखन संजय जाधव, वैभव चिंचळकर यांचे असून पंकज पडघम यांनी संगीत दिले आहे. तर संकलनाचे काम अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी पाहिले असून कला दिग्दर्शक सतीश चिपकर आहेत.