पहिला सिनेमा प्रदर्शनाच्या एक दिवस आधी मराठमोळ्या दिग्दर्शकाचं निधन

गुरूवार, 4 मे 2023 (14:12 IST)
Swapnil Mayekar Death मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक-लेखक स्वप्निल मयेकर यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट उद्या 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा क्षण अनुभवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आल्याने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वप्नील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे.
 
स्वप्नील याचे आज पहाटे चेंबूर घाटलागाव इथे राहत्या घरी निधन झाले. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. स्वप्नील यांनी 'हा खेळ संचिताचा' ह्या दूरदर्शन मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शन केले होते. त्यांनी 'हम है धर्मयोद्धा' या भोजपुरी सिनेमाचे दिग्दर्शन व अनेक मराठी सिनेमांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. 
 
स्वप्नील मयेकर यांनी एक दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा दिगदर्शित केला असून या सिनेमाचं नाव 'मराठी पाऊल पडते पुढे' (Marathi Paul Padte Pudhe) असं आहे. हा सिनेमा उद्या प्रदर्शित होणार आहे. परंतु आदल्याच दिवशी स्वप्नील यांचे निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती