मुंबईकरांना मुबंईत स्वतःच घर असावे असे अनेकांना वाटते.लोक मुंबईत घर घेण्यासाठी मेहनत करतात आणि आपले घर घेण्याचं स्वप्नं पूर्ण करतात. मुंबईत घर घेण्यासाठी अनेक वर्ष मेहनत करावी लागते तर काहींचे हे स्वप्नं कमी वयातच पूर्ण होतात. मुंबईत सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्री गिरीजा प्रभूने वयाच्या 24 व्या वर्षी घर घेण्याचे स्वप्नं पूर्ण केले आहे. स्टार प्रवाह वरील ही मालिका सुख म्हणजे नक्की काय असत या मध्ये तिने गौरीची भूमिका साकारली आहे. या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे.