मुंबईत पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक नामचीन मंडळींनी हजेरी लावून वधूवरास आशीर्वाद दिले. सोशल मीडियावरून देखील या नवीन उभयतांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्रेयसने शेयर केलेल्या फोटो वरून हा लग्न सोहळा किती राजशाही आणि भव्य असेल याचा अंदाज येत आहे. २०१९ हे वर्ष श्रेयशसाठी नक्कीच संस्मरणीय ठरले आहे.