इश्किया गजानन: प्रेमी जोडप्यांसाठी दर बुधवारी व्हॅलेंटाइन डे

दर बुधवारी व्हॅलेंटाइन दिन साजरा करता येत असेल तर प्रेमी जोडप्यांना किती मजा वाटेल. आणि जेव्हा या प्रेमाची साक्ष स्वत: बाप्पा असला तर मग भीती तरी कसली. असेच एक गणपती मंदिर आहे जिथे वयस्कर लोकांपेक्षा तरुणांचा बुधवारी जणू जत्रा भरतो. या मंदिराला लोकं इश्किया गजानन मंदिर म्हणतात.
 
जोधपुरच्या परकोटे्यात जुनी मंडीत गणपती मंदिर इश्क करणार्‍यांसाठी खरोखर देव पावल्यासारखं आहे. गणपती क्यूपिड म्हणजे प्रेमी जोडप्यांना मिळवण्याची इच्छा पूर्ण करतात. येथे नवस मागितल्यावर लवकरच लग्न ठरतं आणि प्रेम करण्यांची मनोकामना पूर्ण होते.
 
कधी गुरु गणपती नावाने प्रसिद्ध गणपती मंदिरात प्रेमाच्या प्रार्थना पूर्ण व्हायला लागल्या आणि भक्तांचे लग्न ठरू लागले तेव्हापासून गणपती इश्किया झाले. सुमारे शंभर वर्ष जुन्या या मंदिराला चार दशकांपासून हे नाव देण्यात आले.
 
हल्लीच्या टेक्नॉलॉजी जगात प्रेमी जोडपे एकमेकांना मेसेज किंवा कॉल करून आपलं मन मोकळं करतात परंतू पूर्वी हे तेवढं सोपं नव्हतं. येथील लोकांप्रमाणे पूर्वी विवाह ठरल्यापासून ते विवाह होण्यापर्यंत यातील मधल्या काळात प्रेमी जोडपे एकांतात भेटण्यासाठी या मंदिरात दर्शनाच्या बहाण्याने येत होते.
 
मंदिर आड बाजूला असल्यामुळे या स्थळापासून लांबपर्यंत कोणी दृष्टी पडत नसल्यामुळे येथे प्रेमी जोडपे अधिक येत असल्यामुळे याचे नाव इश्किया मंदिर पडले. प्रेमी जोडप्यांसाठी हे लव्हर प्वाइंटपेक्षा कमी नव्हतं.
 
असे म्हणतात की महाराज मानसिंग यांना गुरु गणपतीची मूर्ती तलाव खणत असताना करताना सापडली होती. नंतर मूर्तीला जुनी मंडी स्थित निवासासमक्ष प्रतिष्ठित करण्यात आले होते.
 
अजूनही या मंदिराची प्रसिद्धी कमी नाही. योग्य जोडीदाराशी लग्न ठरावं म्हणून मोठ्या प्रमाणात येथे तरुण दर्शनासाठी येतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती