ठिपक्यांची रांगोळी या नाविन्यपूर्ण शीर्षकाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, दारासमोर ठिपक्यांची रांगोळी काढत बसलेल्या माझ्या मुलीला पाहून मनात विचार आला की कसा एक ठिपका दुसऱ्या ठिपक्यापर्यंत रेष काढून जोडला जातो. बघताना हे सगळे ठिपके स्वतंत्र वेगळे एकमेकांपासून काही अंतरावर असले तरी जोडले गेल्यावर सुरेख नक्षी बनते. या मालिकेचं नाव ठिपक्यांची रांगोळी ठेवण्यामागचं हेच कारण असल्याचे त्यांनी सांगितले. जोडून राहिलो तर छान सुरेख नक्षी मात्र एक रेष जरी हलली तरी चित्र विस्कटतं.