नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटाचा वाद; मांजरेकर यांच्यावर कारवाई न करण्याचे निर्देश

मंगळवार, 1 मार्च 2022 (21:13 IST)
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. याचिकेवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत मुंबई पोलिसांना मांजरेकर यांच्यावर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. मांजरेकरांनी तपासात सहकार्य करण्याची तयारी दाखवल्यावर न्यायालयाकडून दिलासा देण्यात आलाय.
 
माहिम पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तो रद्द व्हावा यासाठी महेश मांजरेकर यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना या आधीच्या सुनावणीमद्ये दिलासा देण्यास नकार दिला होता. महेश मांजरेकांना अटकेपासून कोणताही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर आज हा निर्णय न्यायालयाने बदलला असून मांजरेकरांना अटकेपासून दिलासा दिलाय.
 
चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवल्यानं महेश मांजरेकर यांच्या विरोधात कलम २९२, ३४ तसेच पॉक्सो कलम १४ आणि माहिती तंत्रज्ञान कलम ६७ व ६७ ब अंतर्गत माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयानं चौकशीचे आदेश दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती