अमृता फडणवीस यांचे ‘अ ब क’ साठी पार्श्वगायन

गुरूवार, 27 जुलै 2017 (17:22 IST)

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आता त्यांनी अ ब क’ या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. या गाण्यातून मुलगी वाचवामुलगी शिकवा’ असा संदेश दिला आहे. नुकतेच या गाण्याचे रेकॉर्डिंग मुंबईत पार पडले. राहुल रानडे यांनी चित्रपटातील गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. 

 

ग्रॅव्हिटी एण्टरटेन्मेन्ट आणि गोल्डन ग्लोब प्रस्तुत अ ब क’ या चित्रपटाची निर्मिती मिहीर सुधीर कुलकर्णी यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकुमार शेडगे यांनी केले आहे.  या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीतमन्ना भाटियासुनील शेट्टीतन्वी सिन्हा व बालकलाकार सनी पवार दिसणार आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट एकाच वेळी मराठीहिंदीइंग्रजीतमिळ,तेलगू अशा पाच भाषेत तयार केला जाणार आहे.

  

वेबदुनिया वर वाचा