नाटकाची एक प्रस्तुती आणि प्रेक्षकांच्या मनात सुरु असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात

सोमवार, 11 सप्टेंबर 2017 (12:00 IST)
नाटकाची एक प्रस्तुती आणि प्रेक्षकांच्या मनात सुरु असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात. कधी – कधी तर आपण अडकलेल्या परिस्थितीतीतून बाहेर येण्याचे मार्ग दिसू लागतात. नाटकांची परिभाषा केवळ ऐतिहासिक , तथाकथित , मनोरंजन इ. पहायला मिळते. समाजातील ज्वलंत वास्तव दाखवण्यासाठी थियेटर ऑफ रेलेवंस १९९२ पासुन कार्य करत आहे . त्याच्यामध्ये फक्त वास्तव दाखवत नाही तर कुप्रता , परंपरा , संस्कृती याच्या ओझ्याखाली दबलेल्या मानसिकतेला बाहेर काढण्यासाठी काम करत आहे. मंजुळ भारद्वाज द्वारा निर्मित हे तत्व ( philosophy ) समाजातील वेगवेगळे घटक आणि समजातील वेवस्थेवर काम करत आहे. शोषित आणि शोषण करणाऱ्या वर्गाला हे तत्व योग्य दिशा आणि मार्ग दाखवून त्यांना एका समान स्तरावर घेऊन येते . एकमेकांना सामाजिक बांधिलकी मध्ये समान आधिकाराने जगण्यासाठी दिशा दाखवते. 
 
नाटक my name is smilyee ..I am girl या नाटकाची प्रस्तुती दिनांक ८ सप्टेंबर २०१७ रोजी , st. Teresa high school,गिरगांव, मुंबई मध्ये झाली. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे नाटक अगदी सहज आणि सोप्या भाषेत आपला विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. नाटकामध्ये असणार तत्व म्हणजे , हो , मी एक मुलगी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे .
निसर्गाने स्त्री ला बहाल केलेली मासिक पाळी हि सृजनात्मक आहे . तिच्यामध्ये असणारी जन्म देण्याची प्रक्रिया हि या मासिक पाळी मुळे होते . आपल्या भारतीय समाजामध्ये अनेक रूढी आणि परंपरा आहेत. ज्या मुळे समाज अशा अवस्थेत मुलींना आणि महिलांना घरापासून लांब ठेवले जाते. सामाजिक कार्यामध्ये असणारा अधिकार बळकावला जातो. अपराध्याच्या भूमिकेत त्यांना ठेवण्यात येते . या नाटकाच्या माध्यमातून माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला . बाळाला जन्म देणारी महिला पाळी च्या वेळी अशुद्ध कशी असेल . बरं, त्यामध्ये ती देवघरात जाणार नाही , देवाची पूजा करणार नाही, जेवणं बनवणार नाही . कोणाबरोबर खेळणार नाही ,बोलणार नाही . अशा पद्धतीने तिला वागायला समाज लावतो. कुठे ना कुठे ही पद्धत मनामध्ये न्यूनगंड निर्माण करते .मुलींचा , महिलांचा आत्मविश्वास कमी करते. या सृजनात्मक काळामध्ये होणारी चीड - चीड ही मोठ्या प्रमाणात असते . मला या नाटकाच्या माध्यमातून समजले एक व्यक्ती म्हणून अशा स्थिती मध्ये महिलांना मदत करणे . महिन्यातील त्या 5 दिवसांमध्ये त्यांना परिवारापासून लांब न ठेवता त्यांना जाणीव करून देणे की , ही एक नैसर्गिक क्रिया आहे . त्याचं ओझं अंगावर घ्यायचं नाही . आनंदाने हे क्षण जगायचे. स्त्रियांमध्ये होणाऱ्या मासिक धर्माला सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी मला थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताने दिली आहे.
नाटकाचं सादरीकरण 140 ते 160 विद्यार्थी आणि 15 ते 20 शिक्षकांसमोर झाले . नाटक अगदी हसत - खेळत पुढे जातो . नाटकामध्ये सर्वात आवढीचा भाग म्हणजे "दुगडी- दुगडी " या रिदम ने प्रत्येक सीन ( विचार) जोडला आहे . 
 
त्यामुळे दुगडी - दुगडी करत असताना प्रेक्षकांच्या तोंडून आपोआप दुगडी - दुगडी यायचे. नाटकाची भाषा एकदम साधी आणि सोपी आहे . जी सर्व स्तरावर असणाऱ्या प्रेक्षकांना समजते . त्यामध्ये विध्यार्थी ,महिला ,पुरुष आणि वयस्कर माणसे . हसत - खेळत नाटकाचं सादरीकरण पूढे जातं. 
 
त्यामध्ये मुलीचे समानतेचे अधिकार, शिक्षणाचे अधिकार , संपत्ती मध्ये असणारा अधिकार ,पौष्टिक आहारातील अधिकार या समाजामध्ये असणाऱ्या असमान अधिकारांचे चित्रण दृश्याच्या माध्यमातून दाखवले जाते. त्याच बरोबर नाटकातील शोषित कलाकार या सर्व अधिकारांना हक्काने अभिमानाने मागून घेतो तीच बदलाची दिशा ठरली जाते...
 
हे समाजातील वास्तव पाहत असताना प्रेक्षक वर्ग शांत होऊन जातो आणि स्वतः ला त्या ठिकाणी पाहतो . हे सर्व झाल्यानंतर नाटकातील कलाकार येऊन "पाळी "विषयी बोलायला लागते. त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग एकदम शांत झालेला दिसला . संपूर्ण प्रेक्षागृहात शांततेचा वातावरण निर्माण झालेला . मुली एकमेकांकडे पाहत मान खाली घालत होत्या. सुरुवातीला मुलांना नक्की काय सुरू आहे ते समजलेच नाही ते मध्येच आप - आपसात चुळबुळ करत होते. Menstruation cycle हा शब्द आल्यानंतर मुले ही शांत बसली. 
थोड्या वेळानंतर नाटकामधील संवाद पुढे बोलले जात होते त्याच प्रमाणे प्रत्येक प्रेक्षक वर्ग नाटकाला एक टक लावून पाहत होते . नाटकातील शेवटच्या संवादांमध्ये काय - काय काळजी त्यांना घ्यायची आहे . त्याचप्रमाणे स्वतः ची , घरातल्या व्यक्तींची ,समाजाची , शाळा, महाविद्यालय या ठिकाणी त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची व्यवस्था करणे , सकारात्मकतेने या प्रक्रिये मध्ये त्यांना समजून घेणे . या दृश्यामुळे एक समाधान प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसू लागले होते.
 
नाटकाचं सादरीकरण झाल्यानंतर सर्व जण शांत होते . बोलण्यासाठी कोण पुढे येत नव्हते . मग, थोड्या वेळानंतर एक मुलगा उठून उभा राहिला आणि बोलला " मी यापुढे मुलींचा respect करणार . जीवनात घडत असणाऱ्या घटना या ठिकाणी तुम्ही दाखवल्या आहेत. एका शिक्षकाने तर व्यक्तिशः भेटून सांगितले असे विषय विध्यार्थ्यांना कसे सांगायचे हा प्रश्न नेहमी येत असतो पण, नाटकाच्या माध्यमातून अगदी सहज आणि सोप्या भाषेत तुम्ही मांडला आहे.
 
नाटक हे व्यक्तीला त्याच्या अंतकरणातून उभा करण्यासाठी 
सतत कार्य करत असतो . थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतामध्ये तयार झालेलं हे नाटक किशोर वयात आलेल्या विध्यार्थ्यांना मुलींमध्ये सृजनात्मक होणारी प्रक्रियेला सकारात्मक दृष्टीने पाहण्यास मदत करते .
"my name is smilyee , I am girl "नाटकाच लेखन आणि दिग्दर्शन मंजुल भारद्वाज यांनी केल. 
नाटक सादर करणारे कलाकार - अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर ,कोमल खामकर , साक्षी खामकर ,प्रियंका कांबळे आणि तुषार म्हस्के आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती