मंजुल भारद्वाज गेल्या २५-२६ वर्षांपासून थिएटर करत आहेत. थिएटर त्यांच्यासाठी केवळ तमाशा नसून, जीवन जगण्याचा सरळ सुलभ मार्ग तयार करणे आहे. ते जगण्याची सौंदर्याने नटलेली अशी कला विकसित करतात की, जीवन ओझे नसून, जीवन निसर्गाची सुंदर भेट आहे, याची प्रचिती येते.
मंजुल याच उद्देशाने थिएटर करत आहेत, म्हणूनच थिएटरला कलेच्या चौकटीतून बाहेर काढून, फुटपाथ वरील गाजाबाजीत/गजबजलेल्या अंधाऱ्या गुंफांपासून ते युरोपच्या झगमगीत रंगगृहांपर्यंत थिएटर केले आहे आणि अशिक्षितांपासून चिंतकांपर्यंत सर्वांना थिएटरच्या विशालतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित केले आहे.
मंजुल यांनी थियेटर ऑफ रेलेवन्स चे सृजन केले आणि जगासमोर थिएटर चे महत्व रेखांकित केले की, थिएटर ऑफ रेलेवन्स सांस्कृतिक क्रांतीचा नाट्यसिद्धांत आहे. 'थियेटर' नाट्यगृह आणि पथनाट्यापुरते मर्यादित नसून, थिएटर प्रेक्षकांच्या अंतर्मनात निरंतर जागरुकतेचे अभियान चालवण्याचे माध्यम आहे. आत्महीनता आणि अहंकार या विकारांना नष्ट करून, आत्मबळ आणि जीवनाच्या सह-अस्तित्ववादी विचारांना स्थापित करण्याचे माध्यम आहे.
मंजुल यांनी मागील दोन दशकांपासून ही अधिक काळ, आपल्या यात्रेत, कोणताही गाजावाजा वा तमाशा न करता, फुटपाथ आणि झोपडपट्टीतील हजारो लहान मुलांना, बाल कामगारीच्या दलदलीतून बाहेर काढून, शाळेत पोहचवले आहे. शाळेतील मुलांपासून ते देशातील मोठमोठ्या कंपन्या, बँकांचे अधिकारी यांना जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली आहे. त्यांच्या आत दडलेल्या गुलामगिरीच्या भावनेचा निचरा करून, नेतृत्वगुण जागृत केले आहेत.
मंजुल आता आपल्या नव्या कामगिरीकडे वळले आहेत. ते थिएटर च्या माध्यमातून 'राजनीती' बदलायला निघाले आहेत. ते राजनीतीच्या पक्ष निर्धारित संकल्पनेतून राजनीतीला बाहेर काढून, जनोन्मुख राजनीती बनवण्यास सज्ज झाले आहेत. ते जनतेच्या मनात लिडरशीपचा भाव निर्माण करण्यास प्रतिबद्ध आहेत. त्यांचे मानणे आहे की, जोपर्यंत सामान्य माणसापर्यंत राजनीती विषयी जागरूकता निर्माण होत नाही, तोपर्यंत देशाची न राजनीती बदलेल, न व्यवस्था.