"तू बुधवार पेठेतील *** आहेस" यूजरच्या या कमेंटवर अभिनेत्री मानसी नाईकने दिला कडक रिप्लाय

बुधवार, 28 एप्रिल 2021 (11:42 IST)
एका लाइव्ह सेशन दरम्यान मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हिने युझरला चांगलचं झापलं. तिच्यापोस्टवर एका युझरने अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली होती. त्यावर मानसीने प्रत्युत्तर देत त्याला खडसावलं आहे.
 
कलाकरांना ट्रोल करणं हे ट्रे‍ड झालं असलं तरी अनेकदा युझर्स मर्यादा ओलांडून कमेंट्स करतात. मानसी नाईक हिला देखील नुकताच अशा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. परंतु ही ट्रोलिंग सहन न झाल्यामुळे तिने तिने एका लाइव्ह सेशन दरम्यान युझरच्या कमेंटला त्याच्याच शब्दात उत्तर दिलं.
 
मानसीने नाईकने नुकताच एका लाइव्ह सेशनमध्ये भाग घेतला होता. त्यात एका युझरने मानसीच्या पोस्टवर केलेल्या गलिच्छ कमेंटला उत्तर देताना ती म्हणाली, 'तुम्ही मला बुधवार पेठेत कधी बघितलं? तुम्ही तिथे काय करत होतात? बुधवार पेठ ही जागा चालवणार्‍या स्त्रिया स्वतःच्या पोटापाण्यासाठी काम करतात. त्या त्यांच्या हिमतीवर जगतात. त्या प्रामाणिकपणे काम करतात. त्या स्त्रिया तिथे का आल्या असं तुम्हाला वाटत? जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही काम करून खा. पण दुसऱ्यांना अशा घाणेरड्या भाषेत शिव्या घालून काय मिळतं?' असे अनेक प्रश्न विचारत मानसीने युझरला चांगलेच सुनावलं आहे.
 
आपल्या कलाकार किंवा त्यांच्या काही गोष्टी आवडत नसल्याच तरी सोशल प्लॅटफॉर्मवर त्यांच्या घाणेरडे कमेंट्स करणे, शिवीगाळ करणं हे चुकीचं आहे, असं मानसीने म्हटलं. 
Image: Instagram@manasinaik0302

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती