या चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनच्या हेमंत रूपारेल आणि रंजीत ठाकूर, नितिन वैद्य (नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि डी संदीप (कांतिलाल प्रॉडक्शन्स), प्रवीण खरात आणि अनुज अडवाणी यांची आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
हॉरर चित्रपटाच्या आवड़ीबद्दल बोलताना 'काळ' चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डी संदीप म्हणाले, ‘हॉलीवुडमधील या प्रकारच्या म्हणजे हॉरर चित्रपटांनी मी माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये खूपच प्रभावित झालो होतो. त्यासाठी आवश्यक ते संशोधन केल्यानंतर आता प्रेक्षकांना भावेल असा 'काळ' घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट रसिकांचा या प्रकारच्या चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. शिवाय आणखीही हॉरर मराठी चित्रपटांची निर्मिती मराठीमध्ये होण्यासाठी निर्मात्यांना त्यामुळे प्रेरणा मिळेल."
“काळाचं ग्रहण फार वाईट, एकदा लागलं की सहजा सहजी सुटत नाही, या वेगळ्या प्रकारच्या आणि तुम्हाला घाबरवून टाकेल असा या चित्रपटाच्या थरारक अनुभवासाठी २४ जानेवारी २०२० पासून तयार रहा, असेही दिग्दर्शक डी संदीप यांनी म्हटले आहे.”