मराठी नाट्य अभिनेते असलेले शरद पोंक्षे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या मी नथूराम गोडसे बोलतोय या नाटकाने. मध्यंतरी या नाटकावर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्या याच नाटकाला 50 प्रयोग करण्याची परवानगी मिळाली. याच मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाच्या आजच्या अखेरच्या प्रयोगा आधी शरद पोंक्षे यांनी त्यांच्या भावना पोस्टमधून शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी त्यांच्या नवीन नाटकाची देखील घोषणा केली आहे.
काय म्हणाले शरद पोंक्षे त्यांच्या पोस्टमध्ये?
मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाच्या शेवटच्या प्रयोगाआधी अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट फेसबुकवर पोस्ट शेअर केली. आज नथुराम गोडसेचा शेवटचा प्रयोग. माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व कलाकार तंत्रज्ञांनी हे पोस्टर बनवून कालीदास मुलुंडच्या गेटवर लावलं. हे त्यांना करावंसं वाटलं, एवढं प्रेम ते करतात म्हणूनच 25 वर्षे ही टीम टिकली. या प्रयोगात शेवटचं नथुराम रूपात मी बोलेन, मग पूर्णविराम. मग नवीन नाटक हिमालयाची सावली नोव्हेंबर 2024 मध्ये घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद. सध्या ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.