अचानक रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तिने छातीत दुखण्याची तक्रार केली. तिचे पती पराग त्यागी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले, जिथे डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वी तिला मृत घोषित केले. शेफालीच्या मेकअप आर्टिस्टने तिच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. रडत रडत त्यांनी फक्त सांगितले की तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. कुटुंबाने अद्याप यावर कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. 'कांता लगा गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली शेफाली42वर्षांची होती. तिने 'मुझसे शादी करोंगी' चित्रपटात अक्षय कुमार आणि सलमान खानसोबत काम केले होते.
शेफालीच्या मृत्यूच्या बातमीनंतर, तिचा पती परागचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो गाडीत बसलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पराग खूप दुःखी दिसत आहे. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये, शेफालीच्या मृत्यूच्या बातमीने युजर्सनाही धक्का बसला आहे. युजर्सनी अभिनेत्रीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.