अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत दबदबा निर्माण करणार्या अभिनेत्री बेबी शकुंतला (वय- ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले़, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे़ प्रभात फिल्म कंपनीच्या दहा वाजता या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२मध्ये सुरुवात झाली़ त्यानंतर १९४४मध्ये रामशास्त्री या चित्रपटात काम केले़ त्यानंतर मायाबाजार, सीता स्वयंवर, मी दारू सोडली, अबोली, सपना, परदेस, आदींसह सुमारे साठ चित्रपटांत त्यांनी काम केले़़ १९५०मध्ये किशोरकुमार यांच्या नायिका म्हणून परदेस या चित्रपटात प्रमुख नायिकेच्या भूमिकेतही त्यांनी मधुबालासोबत काम केले़