मायक्रोसॉफ्टच्या विक्रीवर चीनमध्ये बंदी

मायक्रोसॉफ्टच्या काही विंडोज उत्पादनांवर चीनमधील न्यायालयाने बंदी घातली आहे. कंपनीने लायसंस कराराचे उल्लंघन केल्याने हे आदेश देण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

एकीकडे चीनमधील बाजारात आपल्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ करण्यासाठी कंपनीने खास योजना आखली असतानाच चीनमध्ये कंपनीच्या काही उत्पादनांवर बंदी आल्याने कंपनीने नाराजी व्यक्त केली आहे.

न्यायालयाने विंडोज 95,2000,2003 आणि विंडोज एक्स पीची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीने न्यायालयाच्या आदेशां विरोधात पुन्हा अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

झ्योंगी इलेक्ट्रॉनिकशी झालेल्या लायसन्स कराराचे मायक्रोसॉफ्टने उल्लंघन केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा