सध्या कोरोनामुळे सामान्य माणसाचे हालच होत आहे,लॉकडाऊन मुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावलेल्या आहे.त्यातून वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाची कंबरच मोडली आहे.गेल्या वर्षी लॉकडाऊननंतर बाजारातील खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्या होत्या.परंतु साथीच्या दुसऱ्या टप्प्यात किमती जास्त वाढल्या आहे.याचा बाजारावर परिणाम होत आहे.
रिफाइंड तेलाच्या किमतीत गेल्या महिन्याच्या तुलनेत 5 रुपयांनी वाढ झाली आहे, तर मोहरीच्या तेलाच्या किंमतीत 20 रुपयांनी वाढ झाली आहे.दिल्ली ग्रेन मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणतात की,खाद्यतेलांच्या किंमतीत वाढ आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेला कारणीभूत आहे.गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांच्या किमती वाढल्याने दिल्लीतील खाद्यतेलांच्या थोकच्या किमतीत 15 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे.