एखाद्या फर्मचा वर्किंग पार्टनर, व्यक्ती किंवा ऑडिटिंगची गरज असणारे इतर अकाउंट्स यांच्यासाठी ITR फाइल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. ज्यांना सेक्शन 92 ईद्वारे रिपोर्ट द्यावा लागतो त्यांच्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.
ITR भरल्यानंतर युजर्सनी तो व्हेरिफाय करणं महत्त्वाचं आहे. फाॅर्म व्हेरिफाय केला नाही, तर इन्कम टॅक्स नियमांप्रमाणे तो वैध मानला जात नाही. व्हेरिफाय करण्यासाठी OTP येतो. त्यासाठी फोन नंबर आधार कार्डाशी जोडला असला पाहिजे. OTP इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर टाकला की रिटर्न व्हेरिफाय होईल. याशिवाय बँक एटीएम, बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट आणि नेट बँकिंगद्वारे ITR व्हेरिफाय करू शकता.