नोटाबंदीनंतर देशभरात डेबिट कार्डच्या वापरात वाढ

बुधवार, 29 मार्च 2017 (09:27 IST)
नोटाबंदीपूर्वी देशातील 40 टक्के लोक डेबिट कार्डचा वापर करत होते.
 
पण 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर, डेबिट कार्डच्या वापराचे प्रमाण 60 टक्क्यावर पोहचलं आहे.
 
याचाच अर्थ नोटाबंदीनंतरच्या काळात देशातील जनतेनं क्रेडिट कार्डच्या वापराऐवजी डेबिट कार्ड वापरण्याला जास्त पसंती दिली.
 
त्यामुळे डेबिट कार्डनं क्रेडिट कार्डला पर्यायी वापर म्हणून मान्यता मिळाल्याचे चित्र आहे.

वेबदुनिया वर वाचा