Twitter कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (13:15 IST)
इलॉन मस्क यांनी शनिवारी ट्विटरच्या सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले. एका आठवड्यापूर्वी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म $44 बिलियनला विकत घेतलेल्या मस्कने गेल्या सात दिवसांत कंपनीमध्ये अनेक मूलभूत बदल केले आहेत. यामध्ये जगभरातील ट्विटरच्या 7500 पैकी 3700 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यासारख्या निर्णयांचा समावेश आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते, त्यांच्याकडून शुक्रवारीच कंपनीचे कॉम्प्युटर आणि ई-मेल ऍक्सेस काढून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
 
जिथे एकीकडे इलॉन मस्क यांच्यावर ट्विटरवर अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याबद्दल टीका होत आहे. त्याचवेळी, शुक्रवारी रात्री उशिरा टेस्ला चीफने स्वतः ट्विट करून याबाबत स्पष्टीकरण दिले. "जो पर्यंत Twitter वर कर्मचारी संख्या कमी करण्याचा प्रश्न आहे, ते दुर्दैवी आहे पण आमच्याकडे पर्याय नव्हता. विशेषत: जेव्हा कंपनी दररोज $4 दशलक्ष (अंदाजे रु. 32 कोटी) गमावत आहे,".
 
मस्क यांनी ट्विटरमध्ये कमाई नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. शुक्रवारी मस्क यांनी ट्विटरच्या कमाईमध्ये तीव्र घट झाल्याची तक्रार केली आणि ते म्हणाले की हे काही एक्टिविस्ट गटांमुळे होतंय जे जाहिरातदारांवर दबाव आणत आहेत. "आम्ही एक्टिविस्टचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. खूप गोंधळ झाला. त्यांना अमेरिकेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवायचे आहे," ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती