यंदा शनिवारी दसरा असल्याने बँकांना सुट्टी आहे. तसेच दुसऱ्या दिवशी १ ऑक्टोबरला रविवार असून तिसऱ्या दिवशी २ तारखेला गांधी जयंतीची सुट्टी आहे. म्हणजे सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे बॅंकेतील महत्त्वाची कामे आताच पूर्ण करून घ्यावी लागणार आहेत.
या ३ दिवस बँका बंद असल्याने ATM मध्ये ३ दिवस पुरेल एवढी रोकड असेलच असे सांगता येत नाही, त्यामुळे मोठी रक्कम लागणार असल्यास ती आधीच बँकेतून काढावी. तसेच डीडी, चेक आदींचे व्यवहार आधीच पूर्ण करावे लागणार आहेत.