केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणार्या तसेच रेल्वेतील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय आता 65 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या काही खात्यात डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय 60 तर काही खात्यांमध्ये 62 होते.
नागरिक आणि रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशात डॉक्टरांच्या कमी संख्येबाबतचा प्रश्न काही अंशी सोडवला जाऊ शकेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले.