स्टेट बँक ऑफ इंडियाने शहरी भागातील बचत खात्यामध्ये महिन्याला कमीत कमी 5 हजार रुपये बॅलन्स बंधनकारक करण्याच्या आपल्या निर्णयात बदल केला आहे. यापुढे एसबीआयच्या खातेधारकांना अकाऊंटमध्ये 3 हजार रुपये बॅलन्स बंधनकारक असेल. वेगवेगळया श्रेणीमध्ये आवश्यक बॅलन्स न ठेवल्यास आकारण्यात येणा-या दंडाची रक्कमही 20 ते 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे.
1 ऑक्टोंबरपासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरु होईल असे बँकेकडून सांगण्यात आले. एसबीआयच्या वेबसाईटवरील माहितीनुसार शहरी भागातील एसबीआयच्या खातेधारकांना बचत खात्यामध्ये कमीत कमी 3 हजार, निम शहरी भागातील खातेधारकांना 2 हजार आणि ग्रामीण भागातील खातेधारकांना 1 हजार रुपये अकाऊंटमध्ये ठेवणे बंधनकारक असेल.