एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेनं आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.
आयसीआयसीआयनं गृहकर्जाच्या व्याजदरात 30 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.30% कपात केली आहे. तर एचडीएफसीनं 0.15% कपात केली आहे. याआधी भारतीय स्टेट बँकेनं देखील गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली होती. ज्या महिलांचं सॅलरी अकाउंट आयसीआयसीआय बँकेतील आहे त्यांना 30 लाखापर्यंतचं होम लोन 8.35% ने मिळणार आहे.