‘ट्राय’ने आपल्या आवडीची टीव्ही चॅनेल्स निवडणे आणि तेवढ्या निवडक चॅनेल्सचे शुल्क भरण्याबाबतची घोषित केलेली नवी व्यवस्था लागू होण्यास केवळ आठ दिवस उरले आहेत. येत्या एक फेब्रुवारीपासून नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी होणार आहे. परंतु, सुमारे 16 कोटी 50 लाख डायरेक्ट टू होम (डीटीएच) आणि केबल ग्राहकांपैकी तब्बल 65 टक्के ग्राहकांनी आपल्या आवडत्या चॅनेल्सची यादीच बनवलेली नाही. त्यामुळे नव्या योजनेस मुदतवाढ मिळणार असल्याचे वृत्त काही वाहिन्यांवरून प्रसारित झाले होते. या पार्श्वभूमीवर ‘ट्राय’ने नव्या योजनेस मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले.