जैतापूर अणू प्रकल्पासाठी फ्रान्सने दिला हा प्रस्ताव

रविवार, 25 एप्रिल 2021 (08:49 IST)
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे अणूऊर्जा प्रकल्पात सहा अणुभट्ट्या तयार करण्याचा अंतिम प्रस्ताव फ्रांसच्या अणूऊर्जा कंपनी ईडीएफने भारतीय अणूऊर्जा महामंडळाला (एनपीसीआयएल) दिला आहे. याबाबत अंतिम रूपरेषेच्या करारावर चर्चा करण्यासाठी मंच तयारी सुरू आहे, असे ईडीएफने सांगितले आहे.
 
प्रकल्पाच्या विकासासाठी एक प्रमुख पाऊल असल्याचे सांगत फ्रांसची ऊर्जा कंपनी ईडीएफने महाराष्ट्रात सहा अणुभट्टया बनविण्यासाठी अंतिम प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती फ्रांसचे राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनी दिली.
 
रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे एकूण ९९०० मेगवॉटच्या क्षमतेचे सहा अणुभट्ट्यांच्या निर्माणासाठी २०१८ मध्ये दोन्ही देशांदरम्यान औद्योगिक करार झाल्यानंतर एनपीसीआयएल आणि ईडीएफदरम्यान चर्चेत प्रगती झाली आहे. तिथे प्रत्येक अणूभट्टी १६५० मेगावॉट क्षमतेची असेल. हा जगातिल सर्वात मोठा अणूऊर्जा प्रकल्प असेल, असा दावा राजदूत इमॅन्युअल लेनिन यांनी केला आहे.
या प्रकल्पामुळे सात कोटी घरांना वीजपुरवठा करण्यात यश मिळणार आहे. दरवर्षी आठ कोटी टन कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन थांबविता येणार आहे. तसेच स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती