सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असताना आता टाटा उद्योग समूहानं मदतीचा हात पुढं केला आहे. ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर आयात करण्याची घोषणा टाटा समूहानं केली आहे.
संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट अत्यंत वेगानं पसरत असताना रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. संपूर्ण देश या संकटाला सामोरा जात असताना टाटा समूहानं जनतेच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. टाटाने द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर आयात करण्याची घोषणा केली आहे.