टाटा समूहाचा फ्रेंच कंपनी एअरबससोबत सर्वांत मोठा करार

बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (10:36 IST)
टाटा समूहाने मंगळवारी (14 फेब्रुवारी) फ्रेंच कंपनी एअरबससोबत इतिहासातील सर्वांत मोठा करार केला आहे.
 
टाटांच्या एअर इंडियासाठी 250 विमाने खरेदी करण्याचा हा करार असून, दोन्ही कंपन्यांमधील हा करार आतापर्यंतचा सर्वांत मोठा करार असल्याचे बोलले जात आहे.
 
या करारांतर्गत टाटा समूहाच्या मालकीची एअरलाइन एअरबसकडून 40 वाइड-बॉडी A350 आणि 210 लहान-बॉडी विमाने खरेदी करणार आहे.
 
या करारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली.
 
यादरम्यान पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचे या मोठ्या करारासाठी अभिनंदन केले.
 
सकाळने ही बातमी दिली आहे.

Published By -Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती