भारताच्या इंजिन नसलेली ट्रेन २९ ऑक्टोबरला रुळावर परिक्षण

भारताची पहिलीच इंजिन नसलेली ट्रेन २९ ऑक्टोबरला रुळावर परिक्षणासाठी येणार आहे. ही ट्रेन शताब्दी एक्सप्रेसची जागा घेणार आहे. ही ट्रेन सेल्फ प्रपल्शन मॉड्यूलवर १६० किमी प्रती किमी वेगानं जाऊ शकते. तांत्रिक वैशिष्ट्यांमुळे या ट्रेनचा वेग इतर ट्रेनपेक्षा जास्त आहे. ट्रेन १८ असं या ट्रेनचं नाव आहे. एकूण १६ डबे असलेली ही ट्रेन शताब्दी ट्रेनपेक्षा कमी वेळ घेईल. या ट्रेनला चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्ट्री (आयसीएफ)मध्ये १८ महिन्यांमध्ये तयार करण्यात आलं. या ट्रेनची प्रतिकृती बनवण्यासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च आला.  या ट्रेनच्या मध्ये २ एक्जिक्यूटिव कंपार्टमेंट असतील. प्रत्येकात ५२ जागा असतील. तर सामान्य डब्यात ७८ जागा असतील.  
 
शताब्दी ट्रेनचा वेग १३० किमी प्रती तास आहे. तर ही ट्रेन १६० किमी प्रती तासाच्या वेगानं धावेल. जर ट्रेन १८ च्या वेगाप्रमाणे रुळ बनवण्यात आले तर ती शताब्दीपेक्षा १५ टक्के कमी वेळ घेईल. ट्रेन १८ मध्ये जीपीएस आधारित प्रवासी सूचना प्रणाली, वेगळ्या प्रकारचे लाईट, ऑटोमेटिक दरवाजे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती