फेसबुककडून 'फेसबुक वॉच' सेवा सुरु

शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018 (09:10 IST)
गुगल आणि युट्यूबला टक्कर देण्यासाठी फेसबुकने 'फेसबुक वॉच' ही सेवा सुरु केली आहे. ज्याप्रमाणे युट्युबवर अधिक सब्सक्रायबर आणि अधिक व्ह्यूज असल्यावर जाहिराती मिळतात. त्याचप्रमाणे फेसबुक वॉचवरही असेल.
 
याबद्दल फेसबुकने सांगितले की, वॉच लॉन्चिंगसोबत आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पब्लिशर्स आणि क्रिएटर्सला दोन्ही प्रकारे मदत करु इच्छित आहे. पहिले म्हणजे युजर्सला व्हिडिओच्या माध्यमातून कमाई करता यावी आणि दुसरे म्हणजे आपला कन्टेंट कसा चालू आहे, याचा नीट अंदाज युजर्संना येईल. या सेवेत युजर्संना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि युट्यूबप्रमाणेच व्हिडिओ कन्टेंट मिळेल. याच्या मदतीने युजर्स फेसबुकवरच वेब सिरीज, पॉपुलर व्हिडिओ आणि टीव्ही शोज पाहु शकतील.
 
पण व्हिडिओच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी फेसबुकने काही अटी ठेवल्या आहेत. त्यानुसार युजर्संना कमीतकमी ३ मिनिटाचा व्हिडिओ बनवावा लागेल. दोन महिन्यांच्या आत या व्हिडिओला ३० हजार लोकांनी कमीतकमी मिनिटभर तरी पाहायला हवा. त्याचबरोबर फेसबुक पेजवर कमीत कमी १० हजार फॉलोअर्स असणे, गरजेचे आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती