फ्लिपकार्ट आणि अमेझॉन यांच्या नुकत्याच झालेल्या सेलमध्ये चीनचे स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सची जोरदार विक्री झाली आहे. भारत-चीन सीमा वादानंतर चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत होती. पण या ऑनलाइन ऑफर्सने भारतीय ग्राहकांना आकर्षित केलंय. फोनच्या विक्रीत दोन अंकी वाढ झाली आहे.