2020 पर्यंत मायक्रोवेव्ह आणि वाशिंग मशीनला देखील स्टार रेटिंग

आतापर्यंत आपण टीव्ही, फ्रीज आणि एअर कंडीशनरमध्ये स्टार रेटिंग नक्की बघितली असेल परंतू काय आपण कधी मायक्रोवेव्ह ओव्हन आणि वाशिंग मशीनमध्ये स्टार रेटिंग बघितली आहे. बहुतेक नाही. पण आता डिसेंबर 2020 पर्यंत कंपन्यांसाठी या दोन्ही प्रॉडक्ट्सची रेटिंग करणे गरजेचे होणार आहे. ऊर्जा मंत्रालयाने ही माहिती दिली.
 
रेटिंगसाठी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसीने मानक निश्चित केले आहेत. वाशिंग मशीनमध्ये विजेसह पाण्याचे खप यासाठी देखील मानक निश्चित केले गेले आहे. ऊर्जा मंत्रालयानुसार याचा उद्देश्य सामान्य जनतेसाठी घरगुती साधनांमध्ये विजेचा खप कमी करणे आहे. 2030 पर्यंत या दोन्ही इलेक्ट्रॉनिक एप्लायंसेजमुळे 300 कोटी युनिटची बचत होईल, असा अंदाज बांधला जात आहे. मंत्रालय कमी वीज खप असणार्‍या उपकरण वापरण्यासाठी लोकांना जागरूक करेल.
 
कंपन्यांनी स्टार रेटिंग लवकरात अमलात आणावे म्हणून रेटिंग प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. ब्युरोने नोंदणी आणि मंजुरीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केले आहे. भारतात दरवर्षी सुमारे 61 लाख वाशिंग मशीनची विक्री होते. ज्यात दरवर्षी 8 टक्क्यांची वाढ होत आहे. तसेच मागील वर्षी 12.1 लाख मायक्रोवेव्ह ओव्हन विकले गेले होते ज्याने दरवर्षी 2 टक्क्यांची वाढ होत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती