जिओनंतर सिल्व्हर लेक आता रिलायन्स रिटेलमध्ये 7,500 कोटींची गुंतवणूक करेल

बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (11:21 IST)
रिलायन्स रिटेलमध्ये 1.75% इक्विटीसाठी सिल्व्हर लेक 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या करारात रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटी मूल्य अंदाजे 4.21 लाख कोटी रुपये आहे. 
 
जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यानंतर सिल्व्हर लेक आता रिलायन्स रिटेलमध्येही गुंतवणूक करीत आहे. सिल्व्हर लेक हे जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठे गुंतवणूकदार मानले जाते. रिलायन्स रिटेलमध्ये सिल्व्हर लेकच्या गुंतवणुकीवरून असे दिसून येते की रिलायन्स रिटेल भारतीय किरकोळ क्षेत्रातील प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आली आहे. अलीकडेच रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुप ताब्यात घेतला होता. 
 
सिल्व्हर लेकने यापूर्वी जिओ प्लॅटफॉर्मवर 1.35 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 10,200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रिलायन्स रिटेल आणि जिओ प्लॅटफॉर्मचे एकूण मूल्यांकन 9 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. 
 
देशातील अनेक शहरांमध्ये पसरलेल्या 12 हजाराहून अधिक स्टोअरमध्ये 64 कोटी लोकं वर्षाकाठी येतात. रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांनी 3 कोटी किराणा दुकान आणि 120 दशलक्ष शेतकर्‍यांना या नेटवर्कद्वारे जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीने नुकतेच किराणा क्षेत्रातील जियोमार्ट या ऑनलाईन स्टोअरची सुरुवात केली आहे. जिओमार्टवर दररोज सुमारे 4 लाख ऑर्डर बुक होत आहेत. 
 
सिल्व्हर लेकच्या कराराबद्दल आनंद व्यक्त करताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, “कोट्यवधी छोटे व्यापारी आपल्या गुंतवणुकीतून भागीदारी करण्याच्या आमच्या परिवर्तनीय कल्पनेत सिल्व्हर लेकशी जोडले गेले आहेत याचा आम्हाला आनंद झाला. भारतीय किरकोळ क्षेत्रातील भारतीय ग्राहकांना मूल्य आधारित सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला विश्वास आहे की रिटेल क्षेत्रात आवश्यक बदल घडवून आणण्यात तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरेल आणि रिटेल इको सिस्टमशी संबंधित सर्व घटक अधिक चांगले विकास प्लॅटफॉर्म तयार करण्यास सक्षम असतील. भारतीय रिटेल क्षेत्रातील आमची दृष्टी वाढविण्यासाठी सिल्व्हर लेक महत्त्वपूर्ण भागीदार ठरेल ”. 
 
या गुंतवणुकीबद्दल सिल्व्हर लेकचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय सहकारी श्री. एगॉन डर्बन म्हणाले की, “मुकेश अंबानी आणि रिलायन्स टीमने त्यांच्या प्रयत्नांद्वारे किरकोळ व तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व मिळवले आहे. इतक्या कमी वेळात जिओमार्टचे यश, खास करून जेव्हा भारत कोविड -19 साथीने जगातील इतर देशांबरोबर झुंज देत आहे, तेव्हा तो खरोखरच अभूतपूर्व आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती