शेअर बाजारात जबरदस्त उसळी, Sensex ने पहिल्यांदा 39,000चा टप्पा गाठला

सोमवार, 1 एप्रिल 2019 (11:52 IST)
नवीन वित्त वर्षात पहिल्याच दिवशी अर्थात 1 एप्रिल रोजी शेअर मार्केटने नवीन रेकॉर्ड बनवला आहे. सोमवारी सेंसेक्स 348 अंशांनी जास्त उसळी मारत 39,000च्या उच्च स्तरावर पोहोचला आहे. हे आतापर्यंतचे रेकॉर्ड स्तर आहे. या अगोदर 29 ऑगस्ट 2019 रोजी सेन्सेक्सने नवीन उच्चांक गाठला होता. तसेच निफ्टीने देखील 11700चा उच्चांक गाठला आहे.   
 
बँक निफ्टीने आज परत नवीन रेकॉर्ड बनवला आहे. हे 200 अशांच्या तेजीसोबत 30627 च्या स्तरावर पोहोचले आहे. पीएसयू बँक, आटो आणि मेटल इंडेक्समध्ये सर्वात जास्त तेजी दिसून येत आहे. टाटा मोटर्स आणि वेदांतामध्ये किमान 4 टक्के तेजी दिसली. तसेच ओएनजीसी आणि कोल इंडियामध्ये  1 टक्के मंदी दिसून येत आहे.   
 
वित्त वर्ष 2018-19 च्या शेवटच्या व्यवसायी दिवशी शुक्रवारी शेअर बाजार बढतीसह बंद झाला. सेन्सेक्सला 127.19 अंक तेजीहून 38,672.91 आणि   निफ्टी 53.90 अंक वरचढ होऊन 11,623.90च्या स्तरावर बंद झाला. शुक्रवारी व्यवसायी दरम्यान सेन्सेक्समध्ये किमान 500 अशांची मंदी होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती