1 एप्रिलपासून BoBमध्ये विलय होणार देना बँक आणि विजया बँक

शुक्रवार, 29 मार्च 2019 (12:11 IST)
बँक ऑफ वडोदरामध्ये देना बँक आणि विजया बँकेचा विलय 1 एप्रिलपासून प्रभावी होईल. अर्थात देना आणि विजया बँकेच्या ग्राहकांचे खाते आता बँक ऑफ वडोदरामध्ये ट्रांसफर होतील. BoB निदेशक मंडळाने विजया बँक आणि देना बँकेच्या शेयरहोल्डर्सला BoBचे इक्विटी शेअर जारी आणि आवंटित करण्यासाठी रेकॉर्ड डेट 11 मार्च निर्धारित केली आहे. विलय योजना अंतर्गत विजया बँकेचे शेअरहोल्डर्सला प्रत्येक 1000 शेअरवर BoB चे 402 इक्विटी शेअर मिळतील. याच प्रकारे देना बँकेच्या शेअरहोल्डर्सला प्रत्येक 1000 शेअरवर BoB चे 110 शेअर मिळतील.
 
विलय झाल्यावर बँक ऑफ बडोदा देशातील सर्वात तिसरी मोठी बँक बनणार. आता 45.85 लाख कोटी रुपये मूल्याच्या व्यवसायासह स्टेट बँक ऑफ इंडिया प्रथम, 15.8 लाख कोटी रुपयांसह एचडीएफसी बँक दुसर्‍या तर 11.02 लाख कोटी रुपये मूल्याच्या व्यवसायासह आयसीआयसीआय बँक तीसर्‍या क्रमांकावर आहे. नवीन बँक ऑफ बडोदाचा व्यवसाय 15.4 लाख कोटी रुपये असणार. या प्रकारे आयसीआयसीआयला मागे टाकत BoB देशातील तिसरी सर्वात मोठी बँक बनेल.
 
ग्राहकांवर प्रभाव
ग्राहकांना नवीन अकाउंट नंबर आणि कस्टमर आयडी मिळू शकतो.
ज्या ग्राहकांना नवीन अकाउंट नंबर किंवा IFSC कोड मिळेल त्यांना नवीन डिटेल्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, इंश्योरंस कंपन्या, म्युच्युअल फंड, नॅशनल पेन्शन स्कीम इतर अपडेट करावं लागेल.
 
SIP किंवा लोन EMI साठी नवीन इंस्ट्रक्शन फॉर्म भरावे लागू शकतात. 
 
नवीन चेक बुक, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड इश्यू होऊ शकतात.
 
फिक्स्ड डिपॉझिट किंवा रेकरिंग डिपॉझिटवर मिळणार्‍या व्याजात बदल होणार नाही.
 
ज्या व्याज दरावर व्हीकल लोन, होम लोन, पर्सनल लोन इतर घेतले आहेत त्यात बदल होणार नाही.
 
काही शाखा बंद होऊ शकतात ज्यामुळे ग्राहकांना नवीन शाखांमध्ये जावं लागू शकतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती