नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आली. त्यानंतर काही दिवसांत दोनशे रुपयांची नोटही रिझर्व्ह बँकेने चलनात आणली. मात्र या नोटा खराब किंवा फाटल्या तर तर त्या बदलून मिळत नव्हत्या. कोणताच कायदा नसल्याने बँक नोटा बदलून देण्यास नकार देत होत्या. मात्र, आता अर्थं मंत्रालयाने अशा नोटा बदलून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केलीय.