महागाई रोखण्यात सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेला आता चांगलेच यश आले आहे. मात्र औद्योगिक उत्पादनाच्या आघाडीवर मात्र परिस्थिती चिंताजनक आहे. सरकारच्या सांख्यीकी विभागाने काल जून महिन्यासाठीची किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार या महागाईचा दर केवळ 1.54 टक्के इतका मोजला गेला आहे. जो की मे महिन्यात 2.18 टक्के सतका होता.
त्याचबरोबर विश्लेषक संस्थानीही गेल्या आठवठ्यात रिझर्व्ह बॅंक आता पुढील पतधोरणात व्याजदरात कपात करण्याची शक्यता असल्याचे सांगीतले आहे. आज अँजेल ब्रोकींगचे वैभव अगरवाल यानी सांगीतले की महागाईचा कमी झालेला दर पाहता रिझर्व्ह बॅंकेला आता व्याजदरात कपात करण्यास वाव आहे. त्याशिवाय खासगी गुंतवणूक वाढून औद्योगिक उत्पादन वाढण्यास चालना मिळणार नाही. मात्र अमेरीकेचे फडरल रिझर्व्ह आपला ताळेबंद किती आखडता घेते याकडे रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष राहणार आहे.