आरबीआयने सलग तिसऱ्यांदा रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली. यामुळे 6 टक्के असणारा रेपो दर आता 5.75 टक्के इतका राहणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे आता बँकांकडून मिळणारे कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. कर्जावरील व्याजदर कमी झाल्याचा नागरिकांना मोठा फायदा होईल. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज यांसारखेंचे हप्ते कमी होतील.