रेपो रेटमध्ये वाढ, गृह, वाहन, वैयक्तिक कर्ज महागण्याची शक्यता
रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले असून वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये पाव टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. रेपोरेटमध्ये वाढ झाल्याने कर्जदारांना याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. गृह, वाहन तसेच वैयक्तिक कर्ज महागण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर रेपो दर ६.५० टक्के इतका झाला आहे.