पीएम मोदी आज करणार आहे या स्कीमची सुरुवात, फक्त 59 मिनिटात मिळतील 1 कोटीचे लोन

शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (12:51 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सूक्ष्म, लघु आणि मधले मध्यम उद्यमां(एमएसएमई)साठी जास्त व्याज सब्सिडी
समेत बरेच इतर उपायांची घोषणा करू शकतात. एका अधिकार्‍याने ही माहिती देत सांगितले की यामुळे एमएसएमई क्षेत्राला गती मिळेल आणि जास्त रोजगार मिळण्यास मदत मिळेल.  
 
अधिकार्‍याने सांगितले की जास्त व्याज सब्सिडीमुळे कर्ज स्वस्त होईल आणि एमएसएमईसाठी कर्ज वितरण वाढू शकत. पंतप्रधान द्वारे घोषित करण्यात आलेल्या उपायांमध्ये हे सामील होऊ शकेल. वित्त मंत्रालय या प्रस्तावांवर काम करत आहे.  
 
एमएसएमई सेक्टरमध्ये 6.3 कोटीपेक्षा जास्त युनिट्स आहे आणि 11.1 कोटी लोकांना यात रोजगार मिळालेला आहे. जीडीपीमध्ये या क्षेत्राचे योगदान 30 टक्के आहे आणि विनिर्माणमध्ये याची भागीदारी किमान 45 टक्के आहे. देशातील ऐकून निर्यातीत या क्षेत्राची भागीदारी 40 टक्केपर्यंत आहे.  
 
एमएसएमई युनिट्स पुढे सर्वात मोठी अडचण म्हणजे वेळेवर उपयुक्त लोन सुविधा मिळवणे असते, कारण यात जास्तकरून युनिट्स पत मूल्यांकनाच्या धोरणात योग्य बसत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती